चाकोरी
चाकोरी
चाकोरी बद्ध जीवन आपुले
त्या चाकोरिताच राहूया
उगीच नात्यांना नाव देऊन
नकोच गम्मत घालवूया.
स्वच्छंदी राहू ,हसू बागडू
नकोत विषय विच्छेदन ते,
दोन घटिकेचे सवंगडी आपण
गुंफूया दिवस सुंदर ते,
खमंग भरीताच्या करूया गप्पा
नातं आपुले गाठेल पुढचा टप्पा
गोडाचे जेवण असो की झणझणीत ठेचा
सुंदर सकाळ म्हणते मेनू तुमचा तुम्हीच ठरवा!
ठेच लागली तिथे तुला
दुखणे मात्र होई मजला.
खत घालिशे तिथे रोपांना
तरारून येई गुलाब इथला!
सत्यभामा भुलवी कृष्णाला
लाघवी मनाने आणि सौन्दर्याने
पण मनावर त्याच्या राज्य केले
सखी सुंदर राधेने!
स्वप्न ही कधीतरीच पडतात
मने देखील क्वचितच जुळतात,
चांदणीला मात्र राहू देत
दूर तिथेच क्षितिजा समवेत!
दूर तिथेच क्षितिजा समवेत
मनीषा पुरंदरे
1.8.19
23.40
चाकोरी
चाकोरी बद्ध जीवन आपुले
त्या चाकोरिताच राहूया
उगीच नात्यांना नाव देऊन
नकोच गम्मत घालवूया.
स्वच्छंदी राहू ,हसू बागडू
नकोत विषय विच्छेदन ते,
दोन घटिकेचे सवंगडी आपण
गुंफूया दिवस सुंदर ते,
खमंग भरीताच्या करूया गप्पा
नातं आपुले गाठेल पुढचा टप्पा
गोडाचे जेवण असो की झणझणीत ठेचा
सुंदर सकाळ म्हणते मेनू तुमचा तुम्हीच ठरवा!
ठेच लागली तिथे तुला
दुखणे मात्र होई मजला.
खत घालिशे तिथे रोपांना
तरारून येई गुलाब इथला!
सत्यभामा भुलवी कृष्णाला
लाघवी मनाने आणि सौन्दर्याने
पण मनावर त्याच्या राज्य केले
सखी सुंदर राधेने!
स्वप्न ही कधीतरीच पडतात
मने देखील क्वचितच जुळतात,
चांदणीला मात्र राहू देत
दूर तिथेच क्षितिजा समवेत!
दूर तिथेच क्षितिजा समवेत
मनीषा पुरंदरे
1.8.19
23.40
Comments