वाळूमध्ये वेडे मन शिंपले शोधत राहते
वाळूमध्ये वेडे मन शिंपले शोधत राहते,
कण्हेरी च्या फुलामध्ये गुलाब हुडकू लागते.
अंधाराला भ्यालीस तरी ठरशील तू भ्याड
अंधाराला भ्यालीस तरी ठरशील तू भ्याड
सोडू नकोस त्या विचाराना, मूल ते चंचल अन द्वाड !
अनोळखी रस्ता, वाटा पाय राहतात शोधत
अनोळखी रस्ता वाटा पाय राहतात शोधत
पिसाट वारा मात्र गुपित राहतो सांगत.
मन काहीबाही जेव्हा, सांगू काही पाहत
मन काहीबाही जेव्हा सांगू काही पाहत
'गप काही बोलशील तर ' त्याला टाकते सांगून
ऐन हिवाळ्यात वसंताची ऊब शोधत राहते
ऐन हिवाळ्यात वसंताची ऊब शोधत राहते
किती हि रोखा वेड मन एकटेच गात राहत !
कितीहि रोखा वेड मन एकटेच गात राहत !
10.2.23
मनीषा पुरंदरे
Comments