सहा वारी वस्त्र जेव्हा , ल्यायली सुंदर ललना
नजरा साऱ्या जगाच्या तिच्या वरूनि अजिबातच हलेना!
शिफॉन , बनारसी, पाटोला चंदेरी
अमाप रंग आणि अफाट किनारी,
गुंडाळून ते 6 वारी वस्त्र म्हणतो कमनीय बांधा
सौन्दर्य आणि शालीनतेने आता इथेच एकत्र नांदा!
असो पोक्त स्त्री वा असो षोडसवर्षीय चपळ बाला
साडीत लपेटता चढते स्फुरण तिजला आणिक सुंदर मधुर घाला.
नवी नवरी सजली ग सुंदर शालू अन shelyat
अलंकाराच तिचा तो , जपून ठेवील बंद संदुकीत.
शुभ्र साडी वाढवी सौन्दर्य आणि मान मरातब अदब
सर्वच ललना दिसती सुरूप नाही कुरूप किंवा बेढब,
असो लग्न , असो पूजा किंवा साधा कार्यक्रम
लुगडे तिचे अविरात चालवी मर्यादेच्या नित्यक्रम
पेहराव साडीचा आवडे मजला झाला कधी न तिरस्कार
अविरत आणि निरंतर राहू देत
सुंदर रंगांचा हा अविष्कार
अविरत आणि निरंतर राहू देत
सुंदर रंगांचा हा अविष्कार
सौ मनीषा पुरंदरे
23,00
9,8,19
Comments