Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

सहा वारी साडी

सहा वारी वस्त्र जेव्हा , ल्यायली सुंदर ललना नजरा साऱ्या जगाच्या तिच्या वरूनि अजिबातच हलेना! शिफॉन , बनारसी, पाटोला चंदेरी अमाप रंग आणि अफाट किनारी, गुंडाळून ते 6 वारी वस्त्र म्हणतो कमनीय बांधा सौन्दर्य आणि शालीनतेने आता इथेच एकत्र नांदा! असो पोक्त स्त्री वा असो षोडसवर्षीय चपळ बाला साडीत लपेटता चढते स्फुरण तिजला आणिक सुंदर मधुर घाला. नवी नवरी सजली ग सुंदर शालू अन shelyat अलंकाराच तिचा तो , जपून ठेवील बंद संदुकीत. शुभ्र साडी वाढवी सौन्दर्य आणि मान मरातब अदब सर्वच ललना दिसती सुरूप नाही कुरूप किंवा बेढब, असो लग्न , असो पूजा किंवा साधा कार्यक्रम लुगडे तिचे अविरात चालवी मर्यादेच्या नित्यक्रम पेहराव साडीचा आवडे मजला झाला कधी न तिरस्कार अविरत आणि निरंतर राहू देत सुंदर रंगांचा हा अविष्कार अविरत आणि निरंतर राहू देत सुंदर रंगांचा हा अविष्कार सौ मनीषा पुरंदरे 23,00 9,8,19

चाकोरी/ क्षितिज

चाकोरी चाकोरी चाकोरी बद्ध जीवन आपुले त्या चाकोरिताच राहूया उगीच नात्यांना नाव देऊन नकोच गम्मत घालवूया. स्वच्छंदी राहू ,हसू बागडू नकोत विषय विच्छेदन ते, दोन घटिकेचे सवंगडी आपण गुंफूया दिवस सुंदर ते, खमंग भरीताच्या करूया गप्पा नातं आपुले गाठेल पुढचा टप्पा गोडाचे जेवण असो की झणझणीत ठेचा सुंदर सकाळ म्हणते मेनू तुमचा तुम्हीच ठरवा! ठेच लागली तिथे तुला दुखणे मात्र होई मजला. खत घालिशे तिथे रोपांना तरारून येई गुलाब इथला! सत्यभामा भुलवी कृष्णाला लाघवी मनाने आणि सौन्दर्याने पण मनावर त्याच्या राज्य केले सखी सुंदर राधेने! स्वप्न ही कधीतरीच पडतात मने देखील क्वचितच जुळतात, चांदणीला मात्र राहू देत दूर तिथेच क्षितिजा समवेत! दूर तिथेच क्षितिजा समवेत मनीषा पुरंदरे 1.8.19 23.40