दोन क्षणांचे मित्र आपण आता नाहीत शपथा नाहीत भाका, निर्मल जलासारखे खळखळून हसुया वावरणार नाहीत तिथे करुणा वा असूया. प्राजक्ता सम चांदणी व्हावं थेट बकुळीचे वेड लयांव श्वेत मोगऱ्यासावे तरताराव नाजूक गुलाबासवे लीन व्हाहव, दूर क्षितिजावर हसतील तारे म्हणतील धुंद मृदगंध कोण अहा रे? प्रांजळ कबुली देतो समीर असें हे मैत्रीचे पवित्र क्षीर! नाही हव्यास ,नाही सलगी आनंद नाचे वाजवीत हलगी वेचित आनंदाचे शिंपले,उल्हासाचे लेण लेऊया संकोच ना करिती इंद्रधनु ही, रंग आपुले मागाय! संकोच ना करिती इंद्रधनु ही ,रंग आपुले मागाय! सौ मनीषा पुरंदरे Welwyn garden city 30.7.19 23.37
Experiences penned in poetic form...