आज परतुनी तुझी आठवण आली, सूर्याचा रक्तिमा कि आकाशाची झळाळी ? शुभ्र चांदण्याने न्हाऊन निघाली, आठवणींची चिमुकली सावली दोष कुणाचा ह्यात, नाही मजला ठाव अजाणतेच चित्र रंगले घेऊनि आठवणींचे भाव ! आठवण कधी असते प्रांजळ झऱ्या सारखी, कधी असते ती लुप्त कामिनी तरी कधी कडक दामिनी ! आसुसला तो जीव साधण्या थोडासा संवाद श्रावणाच्या सरीं मात्र देईनात त्या आशेस दाद ! हे अंतर रोज खूप वाटे, का असावा हा विरह ? हे हेअंतर रोज खूप वाटे का का हा दुरावा ? 11.11.22 WGC
Experiences penned in poetic form...