हलकेच तिची बट कोण सावरुनी गेले ? मधाळ ओठांना कोण चूम्बूनी गेले ? पाषाणातील झरा आज मारे उंच भरारी आकाशातील इंद्रधनू मात्र धरेला कवेत घ्याया झेपवी. घट्ट बाहू थकले उचलुनी अगणित ओझे मणामणाचे ऋण लेवून मन मात्र अतीव सझले कोणाची चाहूल होती ती, कोण बरे हुंकारले ? हुरहुरत्या मनाला हे सोपेच कोडे ना उलगडे निपचित कायेवरुनी जणू हळुवार मोरपीस फिरले अंधारातील साउली ला आज चैतन्य हे लाभले अंधारातील साउली ला आज चैतन्य हे लाभले... मनीषा पुरंदरे ४.१०.१५ WGC
Experiences penned in poetic form...